ताज्या घडामोडी

राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या प्रांत संदेश शिर्के यांच्यावर  कारवाई करा – ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभूळकर

स्वातंत्र्य सैनिकांकडून निषेध व्यक्त

तळेगाव : तळेगाव शहरातील नगरपालिकेत आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी झेंडावंदनाच्या वेळी प्रशासकीय अधिकारी प्रांत संदेश शिर्के यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभूळकर यांनी त्यांचा निषेध करत जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे प्रांत संदेश शिर्के यांच्या वर कारवाई करावी याबाबत तक्रार दाखल केली आहे.

बुधवारी 26 जानेवारी रोजी तळेगाव नगरपरिषदेत प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमात वंदनाच्या वेळी प्रशासकीय अधिकारी संदेश शिर्के हे बूट घालून झेंड्याच्या चबुतरावर गेले. नगरसेवकांनी ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी बूट काढले व ध्वजारोहण गांधी टोपी न घालता केले. यावेळी पोलिस दलाने झेंडा सलामीचा आदेश दिल्यानंतर सर्व नागरिकांनी हात सलामी स्थितीत नेऊन राष्ट्रध्वजाला सलामी दिली. परंतु प्रशासकीय अधिकारी यांनी हात वर करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली नाही त्यांचे हे कृत्य निंदनीय आहे.सदर सत्य घटनेची चौकशी करून राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर फुले-शाहू-आंबेडकर प्रतिष्ठानचे सचिव जयंत कदम व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभूळकर, सामाजिक कार्यकर्ते जमीर नालबंद यांची सही आहे. या अर्जाची एक प्रत पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे यांना देण्यात आली आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!