आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागा – खासदार श्रीरंग आप्पा बारणे
वडगाव : आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत पूर्ण ताकतीने शिवसेना निवडणुकीला सामोरे जाण्याचे व निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनीशी उतरण्याचे संकेत खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले.तसेच शिवसैनिकांनी आगामी निवडणुकीसाठी कामाला लागावे असे मार्गदर्शन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात वडगाव येथील द्वारकाधीश मंगल कार्यालयामध्ये शिवसेनेच्या प्रमुख पदाधिका-यांचे वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या दरम्यान मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीत उपजिल्हा प्रमूख शरद हुलावळे, महिला आघाडी संघटिका शैला खंडागळे यांनी मनोगत व्यक्त केले. तर बैठकीस उपजिल्हा प्रमुख शरदराव हुलावळे, जिल्हा महिला संघटिका शैला खंडागळे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, युवा सेना जिल्हा समन्वयक अनिकेत घुले, महिला तालुका संघटिका अनिता गोणते, शिवसेना संघटक सुरेश गायकवाड,तालुका संघटक अंकुश देशमुख, रमेश जाधव, युवा सेनाचे विशाल हुलावळे, उपतालुका प्रमूख मदन शेडगे, उपतालुका प्रमूख चंद्रकांत भौते, उपतालुकाप्रमूख अमित कुंभार, शिवसेना शहर प्रमुख, देहूरोड व तळेगाव आणी कामशेट विभागप्रमुख, विभाग संघटक,उपविभाग प्रमूख व सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपतालुका प्रमूख अनिल ओव्हल यांनी केले. तर प्रास्तविक तालुका प्रमूख राजेश खांडभोर यांनी तर आभार युवा सेना उपअधिकारी विशाल तिकोणे यांनी मानले.