ताज्या घडामोडी

१९६७-६८ साला पासून ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेली जागा हरवली

थुगांव ग्रामपंचायतचा अजब कारभार

 थुगाव : ग्रामपंचायत थुगांव गावठाण हद्दीत १९६८ सालापासून गबळू कुशाबा पोटफोडे यांच्या नावे नोंद असलेली बखळ जागा ५४ फूट * ५४ फूट ही १९७८ साली कोंडीबा रामा पोटफोडे यांनी खरेदी खताने खरेदी केली. १९८० पासून २०२२ पर्यंत ग्रामपंचायत दप्तरी त्या जागेची नोंद कोंडीबा रामा पोटफोडे व त्यांचे वारस संदीप लक्ष्मण पोटफोडे यांच्या नावे असून देखील दि.२७/१२/२०२१ रोजी संदीप लक्ष्मण पोटफोडे यांनी ग्रामपंचायतीस नळ जोडणी साठी अर्ज केला असता तो ग्रामपंचायतने दि.५/१/२०२२ च्या मासिक सभेत जागा निश्चित नाही म्हणून फेटाळून लावला.

याबाबत विचारले असता जागा कुठे आहे आम्हाला भेटत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे संदीप लक्ष्मण पोटफोडे यांना दिली. यामुळे त्रस्त झालेल्या पोटफोडे यांनी या अजब कारभारावर विरोधात 31 जानेवारी 2000 रोजी ग्रामपंचायतीला निवेदन दिले. जागा हरवली आहे ती ७ दिवसात शोधून द्या. येत्या सात दिवसात समाधानकारक माहिती न मिळाल्यास ग्रामपंचायतीस आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!