ताज्या घडामोडी

लोणावळा पोलिसांनी केला 25 लाखांचा अवैध गुटखा जप्त

लोणावळा : येथे पोलिसांनी मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल सेंटर पॉइंट समोर 25 लाख रुपयांचा गुटखा जप्त केल्याची माहिती लोणावळा उपविभागाचे पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली.

याप्रकरणी टेम्पो चालक जब्बी शेख यास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हैदराबाद येथून आयशर टेम्पो (क्र.MH 11 AL 7723) अवैध गुटखा घेऊन मुंबई येथे विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती राजेंद्र पाटील यांच्या टीमला मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी 20 लाख रुपयांचा गुटखा व 10 लाख रुपयांचा आयशर टेम्पो असा एकूण 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, लोणावळा विभागाचे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस हवालदार एम.बी. गोफणे, अंकुश पवार, मनोज मोरे ,नितीन सूर्यवंशी यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई  केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!