ताज्या घडामोडी

गवळीवाडा येथे हाॕटेल अन्नपूर्णा समोर बुलेट व रिक्षा आणि जीपचे भीषण अपघातात तुंगार्लीतील युवक जागीच ठार

लोणावळा : गवळीवाडा येथे हाॕटेल अन्नपूर्णा समोर बुलेट , रिक्षा आणि बोलेरो जीपचे भिषण अपघातात तुंगार्लीतील युवक जागीच ठार झाला.

सुजल संजय वाघ (वय-१८, रा-इंद्रायणी हौसिंग सोसायटी , नारायणीधाम जवळ,तुंगार्ली , लोणावळा ) असे भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे.

लोणावळा शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी दीड वाजता गवळीवाडा येथे अन्नपूर्णा हाॕटेलसमोर मुंबई पुणे जुना महामार्गावर हा भीषण अपघात घडला. याबाबत फिर्याद देणार रोहीत राजू बच्चे (वय-३०, व्यवसाय -कन्स्ट्रक्शन मटेरियल सप्लायर्स, रा-पद्मप्रभा बंगलो, स.नं.८३, प्लाॕट नं-६, इंद्रायणी को.आॕपरेटिव्ह सोसायटी , नारायणीधाम जवळ,तुंगार्ली , लोणावळा )यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलिसांनी रिक्षाचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा घडला तारीख वेळ व ठिकाण आज ३१ जानेवारी २०२२ रोजी दुपारी सव्वा एक वाजता फिर्यादी चा मामेभाऊ कु. सुजल संजय वाघ ( वय-१८, रा-तुंगार्ली ) हा त्याचे राॕयल एनफिल्ड मो.सायकल क्रमांक एम.एच.४६,ए.ए.९८५६ वरून तुंगार्ली ते लोणावळा मार्केट आसा जुना मुंबई पुणे हायवेवरून जात असताना अन्नपूर्णा हाॕटेलसमोर , लोणावळा येथे खंडाळा बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारी आॕटो रिक्षा क्रमांक एम एच १४,एच.एम.३८६७ हीवरील चालक नामे संजय राम कदम (वय-४७, , इंदिरानगर, ३० नंबर रेल्वे गेटजवळ, खंडाळा , ) याने त्याचे ताब्यातील रिक्षा भरधाव वेगात चालवीत नेवून रस्त्याचे दिसते परिस्थितीकडे दूर्लक्ष करून कोणताही इशारा न करता निष्काळजीपणे उजवीकडे वळविलेने समोरून पुणे बाजूकडून खंडाळा बाजूकडे जाणारी बुलेट क्रमांक एम एच ४६, ए.ए.९८५६ ही रिक्षा वर आदळून त्यावरील सुजल वाघ हा जंप करून रोडचे पलीकडील खंडाळा बाजूकडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या बोलेरो जीप क्रमांक एम.एच.१२, एन एक्स ०२९१ चे बोनेटवर समोरून आदळून आपघात करून सुजल वाघ याचे किरकोळ , व गंभीर दुखापतीस व तसेच मृत्यूस व वाहनाचे नुकसानीस कारणीभूत झाला.

याबाबत खंडाळा दूरक्षेञ आॕकरन्स रजि.१८/२१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला तसेच व जे.एम.एफ सी.सी वडगाव कोर्ट येथे रवाना केला.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.बावकर करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!