ताज्या घडामोडी

पर्यावरण पुरक सायकल वारीचे-दिघी ते कोल्हापूर प्रस्थान

चिंचवड : आज श्रीगणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर मॉविक सायकल क्लबच्या वतीने पर्यावरणपुरक सायकल वारीचे दिघी येथुन सुरुवात झाली.मॉविक क्लबचे अध्यक्ष, दत्ताभाऊ घुले व त्यांचे सहकारी मयुर पिंगळे, सुनिल पाटोळे, देवेंद्र सावंत, सौरभ खोत व प्रसाद वांगीकर ह्यांनी वारीत सहभागी घेतला.

सायकल वारी दिघी, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज मार्गे कोल्हापुरात जाईल. ह्या वारीला शुभेच्छा देण्यासाठी धनंजय खाडे, महमंदशरीफ मुलाणी, के.के.जगताप सर, रज्जाक पठाण, संजय ववले, सिद्धार्थ गायकवाड हे स्थानिक नागरिक उपस्थित होते.

ह्याप्रसंगी ज्ञानदा कदम हृया लहान मुलीने गणपतीची आरती म्हटली व वारीला सुरुवात झाली.सायकल वारीच्या माध्यमातून, सायकल चालवा, इंधन वाचवा माझा कचरा, माझी जबाबदारी..! स्वच्छ तलाव, शुध्द पाणी…! इत्यादी विषयांवर जनजागृती जागोजागी करण्यात येईल. यावेळी पर्यावरणाचे महत्व समजावून सांगितले जातील. तसेच ऐतिहासिक रंकाळा तलावाची स्वच्छता मोहीम स्थानिक नागरिकांच्या मदतीने तेथे करण्यात येणार आहे. स्वच्छतेचे जीवनातील महत्व समजावून सांगिण्यासाठी हे युवक २५० कि.मी. चा प्रवास करणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!