ताज्या घडामोडी

शिलाटणे उपसरपंचपदी मनिषा भानुसघरे बिनविरोध

कार्ला : मावळ तालुक्यातील शिलाटणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मनिषा दत्तात्रय भानुसघरे यांची बिनविरोध निवड झाली. या आधीच्या उपसरपंच माधुरी भानुसघरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच गुलाब अहिरे यांच्या अध्यक्षते खाली ग्रामसेवक अश्विनी झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. निर्धारित वेळेत भानुसघरे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी झेंडे यांनी मनिषा भानुसघरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

यावेळी ग्रामपंचायत सरंपच गुलाब आहिरे, माजी उपसरपंच माधुरी भानुसघरे,कांचन भानुसघरे,निर्मला भानुसघरे,सदस्य शरद आहिरे, सदस्या सोनली येवले,अश्विनी भानुसघरे,जनाबाई कोंडभर,रुपाली कोंडभर उपस्थीत होते .

यावेळी मावळ खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे,राष्ट्रवादी सेवादल अध्यक्ष तानाजी भानुसघरे,कामशेट सोसायटी चेअरमन संभाजी येवले,माजी सरपंच हेमंत भानुसघरे,ज्ञानदेव भानुसघरे,संभाजी भानुसघरे,मा.सरपंच भरत कोंढभर,संतोष कोंढभर,पोलिसपाटील ज्ञानदेव भानुसघरे,संतोष भानुसघरे,विनायक कोंढभर, बाळासाहेब  भानुसघरे,संग्राम भानुसघरे,अरुण भानुसघरे, प्रकाश भानुसघरे,अनिल भानुसघरे, बाळासाहेब आहिरे, रामदास भानुसघरे,संभाजी भानुसघरे,दत्ता भानुसघरे,सुदाम भानुसघरे,गणपत भानुसघरे,पप्पु शिंदे,निवृती ढम,पांडुरंग येवले,संतोष कोंढभर,संजय मोरे,यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!