ताज्या घडामोडी

जिल्हा परिषदेचे कृषी व पशू संवर्धन सभापती कोणती खेळपट्टी (कोणता गट) निवडणार मावळ तालुक्याला उत्सुकता

वडगाव ‌: जिल्हा परिषद नवीन गट रचना तयार झाली आहे.मावळ तालुक्यात सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे जिल्हा परिषद सदस्य सभापती बाबुराव आप्पा वायकर कुठल्या गटात उमेदवार म्हणुन उभे राहणार.

नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण मावळ तालुक्यात बाबूराव वायकर आहेत.त्यामुळे असा जिल्हा परिषद सदस्य सभापती बाबुराव आप्पा वायकर सर्वांना आपल्याकडे असावा असे वाटत आहे. त्यांनी आपल्याच गटात उभे राहावे यासाठी त्यांना सर्वच गटातून कार्यकर्त्ये त्यांची  मनधरणी करत आहेत.

विकासकामे,तालुक्यातील दांडगा जनसंपर्क, सांप्रदायिक वारसा,सुसंस्कृत,सुशिक्षित आणि अभ्यासु व्यक्तिमत्व यामुळे प्रत्येक गटातील कार्यकर्त्याना आपल्याच गटात बाबुराव आप्पा नेता हवा अशी अपेक्षा आहे.

त्यामुळे बाबूराव आप्पा कुठला गट निवडणार हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे?  मात्र बाबुराव वायकर कोणत्या गटात जाणार  हे अद्याप गुलदस्त्याच आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!