कलापिनी तळेगाव व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित कै.बाळासाहेब गद्रे नाट्यवाचन स्पर्धेला उत्साहात सुरुवात
तळेगाव : कलापिनी तळेगाव व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे आयोजित कै.बाळासाहेब गद्रे नाट्यवाचन स्पर्धेला कलापिनी सांस्कृतिक केंद्रात उत्साहात सुरुवात झाली.
नाट्यपरिषद कार्यकारीणी सदस्य डॉ.मिलिंद निकम, आवाज न्युज चॕनेल प्रमुख वार्ताहर व नाट्य परिषद कार्यकारिणी सदस्य राजेश बारणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन स्पर्धेस प्रारंभ झाला.
या स्पर्धेची व्याप्ती महाराष्ट्र पातळी पर्यंत जावी अश्या शुभेच्छा राजेश बारणे आणी डॉ. मिलींद निकम यांनी आपल्या मनोगतात दिल्या.या स्पर्धेत मावळ,पिंपरी चिंचवड आणी पुणे परिसरातील ३४ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.ज्योती गोखले (समुपदेशक), डॉ.सुहास कानिटकर(रंगकर्मी), पाटणकर (आकाशवाणी निवृत्त अधिकारी)विराज सवाई (आकाशवाणी निवेदक) हे स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत.
या प्रसंगी कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे, कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, नाट्य परिषदेचे प्रमुख विश्वास देशपांडे, कलापिनी कार्यकारिणी सदस्य डॉ.विनया केसकर उपस्थित होते.
आज आणि उद्या होणाऱ्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या संध्याकाळी ६ वा कलापिनी सांस्कृतिक केंद्रात होणार आहे.