ताज्या घडामोडी

शिवसेना माजी पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचे निधन

 

पिंपरी : शिवसेनेचे माजी पुणे जिल्हा प्रमुख गजानन पोपट चिंचवडे यांचे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते.

त्यांच्या मागे पत्नी शिवसेना नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे आणि दोन मुले असा परिवार आहे.

आज सकाळी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळून पडले. त्यांना लोकमान्य रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

चिंचवडगाव येथील होतकरू कार्यकर्ते,अत्यंत मनमिळावू स्वभाव सर्वांशी दांडगा संपर्क असलेले चिंचवडे यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

सुरुवातीला प्राध्यापक रामकृष्ण मोरे सर यांच्या मुळे त्यांनी काँग्रेस मधून राजकीय प्रवास सुरू केला. पीसीएमटी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती.गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!