पहिली ते आठवीचे वर्ग सोमवार पासून पूर्णवेळ सुरू
पुणे : कोविड संसर्ग कमी झाल्याने पहिली ते आठवी चे वर्ग पूर्णवेळ सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर उषा ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव,जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी सर्वांन दक्षता घेणे गरजेचे आहे.जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचा वेग कोवॅक्सिनचा साठा उपलब्ध नसल्याने मंदावला आहे. कोवॅक्सिनचा पुरवठा होण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील लसीची दुसरा मात्र घेणाऱ्यांचे प्रमाण वाढवावे असेही त्यांनी सांगितले.