ताज्या घडामोडी

पिंपळोलीत माता रमाई जयंती निमित्ताने विविध स्पर्धा 

पिंपळोली : पिंपळोलीत रमाई महिला बचत गट व संघर्ष मित्र मंडळ यांच्या वतीने त्रिशरण बुद्ध विहार येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच या निमित्ताने महिलांसाठी व मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई यांच्या प्रतिमेला सामाजिक कार्यकर्ते अंकुश चौरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रमाई महिला बचत गट अध्यक्ष रूपाली चौरे, माजी उपसरपंच आनंदा चौरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यानंतर अजय पवार व उपस्थितांनी बुद्ध पूजा घेतली. ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ चौरे यांनी मनोगतात माता रमाई यांच्या बद्दल माहिती दिली. तसेच किर्ती चौरे, तेजस्विनी चौरे, अस्मिता चौरे यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली.

जयंतीचे औचित्य साधत महिलांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते.तर लहान मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या स्पर्धकांना रोख स्वरूपात बक्षिसे वाटण्यात आल्यानंतर रमाई महिला बचत गटाच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!