ताज्या घडामोडी

साळुंब्रे येथे पवना नदीवर पुलाच्या बांधकामासाठी 14 कोटी 50 लाखांचा निधी

शिरगाव : साळुंब्रे येथील पवना नदीवर नवीन कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा व त्यावर दुपदरी पूल बांधण्याच्या कामासाठी आमदार सुनील शेळके यांनी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून सुमारे 14 कोटी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचे भूमिपूजन मंगळवार (दि. आठ) रोजी कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका सुनील शेळके व स्थानिक महिलांच्या हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी बोलताना सारिका शेळके म्हणाल्या, मावळ तालुक्यात असे एकही गाव नाही की ज्या गावात आमदार शेळके यांनी निधी उपलब्ध करून दिला नाही. मागील अनेक वर्षांपासून रखडलेली विकास कामे अवघ्या दोन वर्षात मार्गी लावली आहेत.आपल्या गावातील विकास कामांसाठी आमदार शेळके यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. मात्र दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ग्रामस्थांची आहे.

यावेळी सरपंच उज्वला आगळे,उपसरपंच द्वारकाबाई राक्षे, ग्रामपंचायत सदस्य सुजाता अनपट ,हर्षदा बोडके, साळुंब्रे राष्ट्रवादी महिला अध्यक्ष राणी राक्षे, साळुंखे विकास सोसायटीच्या अध्यक्ष सिंधू राक्षे, माजी सरपंच कल्याणी राक्षे, रेश्मा विधाते, इंदुबाई राक्षे, शकुंतला राक्षे, मनीषा आगळे, पाटबंधारे विभागाचे विभागीय अभियंता अशोक शेटे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!