ताज्या घडामोडी

बालकांची महाआरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

176 बालकांची करण्यात आली तपासणी

कामशेत : जिल्हा परिषद पुणे, डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी व जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र खडकाळा, ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ-कान्हे, एकात्मिक बाल विकास विभाग पंचायत समिती मावळ यांच्या संयुक्त नियोजनात आज गुरुवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी प्रा.आ.कें खडकाळा येथे 0 ते 6 वयोगटातील 176 बालकांची विशेष तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. तसेच यावेळी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.सदर रक्तदानात 25 दानशूर व्यक्तींनी सहभाग घेऊन योगदान दिले.

सदर शिबिरास श्री सुधीर भागवत( गट विकास अधिकारी मावळ), डॉ. चंद्रकांत लोहारे (तालुका आरोग्य अधिकारी पं. स. मावळ) ,डॉ मिलींद सोनवणे (वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ) श्री विशाल कोतागडे (बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती मावळ),डॉ वामन गेंगजे ( वैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषद पुणे) आदींनी भेट देऊन मार्गदर्शन केले.

सदर शिबिरात बालरोगतज्ञ, दंतरोग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, जनरल मेडिसिन तज्ञ आदींनी बालकांची तपासणी केली. तसेच सर्व बालकांना मोफत औषधोपचार देण्यात आले याप्रसंगी सर्व बालकांना पोषण आहाराचे वाटप व भोजनाचे देखील नियोजन करण्यात आले होते.

सदर शिबिरातून ज्या बालकांना पुढील तपासणीची आवश्यकता आहे अशा बालकांना पुढील सर्व शस्त्रक्रिया, तपासणी, उपचार देखील पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.

सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल येथील वैद्यकीय पथक, डॉ मिलिंद सोनवणे, डॉ मेघा पद्मने, श्री विशाल कोतागडे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच तळेगाव दाभाडे, टाकवे, आढले प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असणारे सर्व वैद्यकीय अधिकारी ,समुदाय आरोग्य अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!