ताज्या घडामोडी

वाचनवेड संस्थेच्या वतीने आंदर मावळातील शाळांना पुस्तके वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न

देहूतील अभंग प्रतिष्ठानचा यासाठी पुढाकार

पुणे : येथील वाचनवेड संस्थेच्या माध्यमातून व देहू येथील अभंग प्रतिष्ठाणच्या पुढाकारातून वडेश्वर येथील शाळेत आंदर मावळातील १९ शाळांना अवांतर वाचनाची पुस्तके देण्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

यावेळी देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.किशोर यादव,अभंग प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष सुजित मोरे,शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णा भांगरे,मा.उपसरपंच सचिन कुंभार,प्रा.विक्रम भोईटे,आमदार सुनिलआण्णा शेळके यांचे सहाय्यक रुपेश सोनुने,उद्योजक विक्रम मोरे,माजी अध्यक्ष प्रा.विकास कंद,केंद्रप्रमुख रघूनाथ मोरमारे,मुख्याध्यापक सुनिल साबळे इ.मान्यवर उपस्थित होते.

बोधकथा,गोष्टी,नेत्यांची चरित्रे,पर्यावरण इ.विषयांचा अंतर्भाव असणारी ही अवांतर वाचनाची पुस्तके विद्यार्थी हीतासाठी उपयुक्त आहेत.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून शालेय पाठ्यपुस्तके वितरीत केली जातात.परंतू अवांतर वाचनासाठी आवश्यक वाचनसाहित्य उपलब्ध असतेच असे नाही.वाचनवेड संस्थेचे प्रमुख किरीटी, मोरे‌ सर,  मयूर सेठ यांच्या माध्यमातून हर्षद सुराणा,सांभव भाटिया,दिपेन जैन तसेच श्री.संतोषी मित्र मंडळ,पुणे यांच्या सहकार्यातून सदर पुस्तके या सर्व शाळांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली.वाचन व्यक्तीमध्ये प्रगल्भता निर्माण करते तसेच वाचनाने व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते असे मत मा.अध्यक्ष प्रा.विकास कंद यांनी व्यक्त केले.शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णा भांगरे म्हणाले,”विद्यार्थ्यांनी मिळालेल्या पुस्तकांचे वाचन करुन अवांतर वाचनाची सवय लावावी तसेच अधिकाधिक पुस्तके वाचावीत.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनिता राजपूत यांनी तर सुत्रसंचालन उमेश माळी यांनी केले.संयोजन सुनिल साबळे,स्वप्नाली नाईक,कुंडलिक लोटे,पुनम नाईकरे, गोकूळ लोंढे यांनी तर आभार रघूनाथ मोरमारे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!