ताज्या घडामोडी

लोणावळ्यात ट्रॅफिक वॉर्डनला केलेल्या मारहाणीत आरोपीला जामीन मंजूर

लोणावळा : लोणावळ्यात ट्रॅफिक वॉर्डनला झालेल्या मारहाणीतल्या आरोपींना वडगाव येथील नुकत्याच झालेल्या जिल्हा व सत्र न्यायालयातील सुनावणीत जामीन मंजूर झाला आहे.

लोणावळ्यात ट्रॅफिकचे नियम न पाळल्यामुळे ट्रॅफिक वॉर्डनने वाहनाचा फोटो काढला. त्यामुळे तिन्ही आरोपींनी वॉर्डनला जबर मारहाण केली. या मारहाण करणाऱ्या विवेक कौल, अशोक कौल, वीरेंद्र कौल यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

त्यासंदर्भात अशोक कौल व वीरेंद्र कौल यांचा 9 फेब्रुवारी रोजी अटकपूर्व जामीन दाखल केला होता. त्यांना मे.न्यायालयाने अंतरिम् जामीन मंजूर केला होता.आज मुख्य आरोपी विवेक कौल यांना जामीन मंजूर झाला असून आरोपींच्या वतीने अॅड. सौरभ दाभाडे व अॅड. संजय वांद्रे यांनी युक्तिवाद केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!