ताज्या घडामोडी

शिवजयंती साजरी करण्यासाठी कोरोना नियमांमध्ये शिथिलता देण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील – अजित पवार 

पुणे : जागतिक तसेच देशपातळीवर कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सात दिवसांनी 19 फेब्रुवारी रोजी आहे. यावर्षी शिवजयंती साजरी करण्यासाठी कोरोना नियमांमध्ये शिथीलता देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुण्यातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा आज पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. आढावा बैठक संपल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुण्यात अद्यापही 15 ते 18 वयोगटातील लसीकरण होण्यास अडचण येत आहे. भारत बायोटेक कोव्हॅक्सिनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात करत नाही. मुंबईत गेल्यावर यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर संवाद साधून पुणे आणि महाराष्ट्राला कोव्हॅक्सिनचा साठा देण्यासाठी मागणी करू असे अजित पवार म्हणाले.

कोरोना नियमांमध्ये हळूहळू शिथीलता आणण्याचा प्रयत्न राज्य स्तरावर चर्चा केल्यानंतर घेण्यात येईल. मात्र जोपर्यंत कोरोना संपत नाही तोपर्यंत सर्वांना मास्क वापरावाच लागेल असेही ते म्हणाले.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!