ताज्या घडामोडी

शनिवारी सारिका शेळके यांच्या हस्ते सपना मेकॳप स्टुडिओ व अॅकॅडमीचे उद्घाटन

उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचे शितल शिंदे यांचे आवाहन

तळेगाव दाभाडे: २६ वर्षाच्या यशस्वी वाटचालीनंतर सपना ब्युटी पार्लर चा व्यवसाय विस्तार करत ब्रायडल मेकअप स्टुडिओची उभारणी करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे गाव भागातील भाग्यश्री चेंबर्स, शॉप नंबर १/ब, प्लॉट नंबर १, वैद्य कॉलनी येथे गेली २६ वर्ष पार्लर चालवण्यासह सौंदर्याविषयी प्रशिक्षण देणाऱ्या सपना ब्युटी पार्लरच्या संचालिका मेकअप आर्टिस्ट शितल सूर्यकांत शिंदे यांनी काळाची गरज ओळखून ब्रायडल मेकअप चे उच्च प्रशिक्षण घेऊन तयार केलेल्या या अद्यावत मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी चे उद्घाटन शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता मावळचे आमदार सुनिल शेळके तसेच त्यांच्या पत्नी सारिका सुनील शेळके संस्थापिका कुलस्वामिनी महिला मंच, मावळ यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

मावळ तालुक्यात ब्रायडल मेकअप सारखी अत्याधुनिक कलेचे प्रशिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून या स्टुडिओ आणि अकॅडमीची उभारणी केली आहे. तरी उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन शितल सूर्यकांत शिंदे यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!