ताज्या घडामोडी

नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी मोफत युनिव्हर्सल पास मोहीम

आत्तापर्यंत 1142 नागरिकांनी घेतला मोहिमेचा लाभ

तळेगाव : तळेगावचे नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वतीने  शहरातील नागरिकांना शुक्रवार ( दि.१८ फेब्रुवारी ) पासून मोफत युनिव्हर्सल पास (स्मार्ट कार्ड) मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 1142 नागरिकांनी युनिव्हर्सल पास काढून या मोहिमेचा फायदा घेतला आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद येत असून ही योजना १८ फेब्रुवारी  ते ०५ मार्च  पर्यंत सुरु राहणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजही नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी  काही बंधने आहेत. सार्वजनिक ठिकाणी कोरोना लसीचे दोन डोस झाले असेल तरच प्रवेश आहे. यासाठी शासनाने नागरीकांना युनिव्हर्सल पास काढण्यास सांगितले आहे. युनिव्हर्सल पास मध्ये व्यक्तीचा फोटो, लसीकरणाचे दोन्ही डोस झालेली माहिती असते. दोन्ही डोस झालेले प्रमाणपत्र सोबत बाळगणे शक्य नसल्याने नागरिकांच्या सोयीसाठी युनिव्हर्सल पास ही योजना राबविली आहे.

यासाठी मोहिमेअंतर्गत नागरिकांनी श्री. डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था, गणपती चौक, तळेगाव दाभाडे येथे दुपारी १२ ते सायंकाळी ०५ या वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन संतोष भेगडे यांनी केले आहे.

युनिव्हर्सल पास काढणेसाठी नियम व अटी
१.दुसरा डोस होऊन १४ दिवस झाल्यावर युनिव्हर्सल पास काढता येतो.
२.लसीकरण करताना रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!