ताज्या घडामोडी

पंडित नेहरू विद्यालयात लायन्स क्लब कामशेतच्या वतीने सॅनेटरी नॅपकिनचे वाटप

कामशेत : लायन्स क्लब कामशेत आयोजित कार्यक्रमात लायन्स क्लब कामशेतच्या उपाध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे तसेच माजी रीजन चेअरपर्सन महेश शेट्टी यांच्या वतीने पंडित नेहरू विद्यालय कामशेत विद्यालयातील उच्च माध्यमिक विभागातील 11 व 12 वीत शिकणाऱ्या मुलींचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी ३०५ मुलींना सॅनिटरी नॅपकिन व खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अजीनाथ ओगले ,लायन्स क्लब कामशेतच्या अध्यक्षा अंजलीताई सहस्त्रबुद्धे , उपाध्यक्षा सायलीताई बोत्रे , माजी रिजन चेअरपर्सन महेश शेट्टी, माजी झोन चेअर पर्सन जितेंद्र बोत्रे, यांनी मनोगत व्यक्त केले.

विद्यालयाच्या पर्यवेक्षिका धनश्री साबळे, सेक्रेटरी नंदा शेट्टी, खजिनदार आशा अगरवाल तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीवनी पाटील व सूत्रसंचालन संदीप बोंबले यांनी केले. आभार प्रदर्शन पूनम कचरे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन कविता गायकवाड, पूजा धनवटे, सृष्टी गायखे ,काजल पावरा यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!