ताज्या घडामोडी

बेकायदेशीर दुचाकी व्यवसायाला परवानगी नाही; सरकार रिक्षाचालकांच्या बाजूने – अजित पवार

बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आश्वासन

पिंपरी : बेकायदेशीर दुचाकी व्यवसायाला कायदेशीर परवानगी नाही याबद्दल मी परिवहन आयुक्तांना पोलिसांना योग्य ते आदेश दिले आहेत बेकायदेशीर गोष्टींना आमचे समर्थन नसून सरकार रिक्षाचालकांच्या बाजूने असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळाला दिले.

महाराष्ट्रात वीस लाख रिक्षाचालक मालक असून त्यांचे प्रश्न बिकट झाले आहेत. लवकरच त्यांच्या प्रश्नांबाबत व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याचेही पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या बैठकीस कृष्ण कराड रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गफारभाई नदाफ,कार्याध्यक्ष रहीमभाई पटेल, सदाशिव तळेकर आदींसह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!