ताज्या घडामोडी

रोटरीच्या वतीने आयोजित शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिबिरात अडीचशेहून अधिक रुग्णांची मोफत तपासणी

तळेगाव : शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र ( सरकारी दवाखाना )सुभाष चौक ,तळेगाव दाभाडे येथे आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे संस्थापक अध्यक्ष  विलास काळोखे यांचे शुभहस्ते किरण ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली व  तानाजी मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

बुधवार,दि.२३ फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हा परिषद, पुणे व मायमर वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ डॉक्टर यांच्या सहकार्याने सर्वरोग शिबिर आयोजित केले होते.

या मध्ये मेडिसिन, हृदयरोग,उच्चरक्तदाब, मधुमेह, दमा, सर्जरी, स्त्रीरोग, अस्थिरोग, बालरोग चिकित्सा, नेत्ररोग, नाक-कान घसा, त्वचारोग,दंतचिकित्सा संबंधित २५० हून अधिक रुग्णांची तपासणी, चाचण्या वऔषधोपचार मोफत करण्यात आले.

शिबिराचे नियोजन डॉ उमेश गुट्टे, डॉ राजेंद्र मोहिते, डॉ दिनेश महालिंगे, डॉ शिल्पा बागलकोटकर, डॉ गायत्री मोरे , आरोग्य सेविका हिंगणे सिस्टर व प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगांव दाभाडे व मायमर वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व सहकारी यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!