ताज्या घडामोडी

चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना वडगाव पोलिसांनी केले जेरबंद

एक लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त

वडगाव : दोन किराणा दुकानांसह खाद्यपदार्थांच्या दुकानात चोरी करणाऱ्या तीन जणांना वडगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विकास लक्ष्मण लाटणे (रा. तळेगाव दाभाडे), विशाल मधुकर लाखे (रा.तळेगाव दाभाडे) व मोहन सोनार (रा. रावेत )अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडगावातील लक्ष्मी फुड या खाद्यपदार्थाच्या दुकानात गेल्या आठवड्यात चोरी झाली होती. पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी गुन्ह्याची दखल घेऊन पोलिस पथक बनवून तपासाबाबत सूचना केल्या होत्या.रात्री गस्त घालत असताना पोलिसांनी काही संशयितांना साई समर्थ नगर येथून ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशी दरम्यान त्यांनी वडगाव मावळ हद्दीतील दोन तळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलिस निरीक्षक विलास भोसले, उपनिरीक्षक संतोष चामे, विजय वडीदे, सुनील जावळे, हवालदार अजित ननवरे, सुनील मगर ,आदित्य भोगाडे प्रतीक बनसोडे यांच्या पथकाने केली.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!