ताज्या घडामोडी

लोणावळ्यात बारावीच्या परिक्षेला प्रारंभ

लोणावळा केँद्रासह सहा केँद्रावर १३९५ विद्यार्थी बसले परीक्षेला

लोणावळा : येथील विद्या प्रसारिणी सभेच्या डी.पी.मेहता कनिष्ठ महाविद्यालयासह सहा परीक्षा केंद्रावर सुमारे १३९५ विद्यार्थी एच.एस. सी.परिक्षेला बसले आहेत .आज इंग्रजी विषयाचा पेपर होता.

डी.पी मेहता कनिष्ठ महाविद्यालय केँद्रावर -१०४३ विद्यार्थी व विद्यार्थीनी बसले . डाॕन बाॕस्को विद्यालयाचे केंद्रावर -९२, लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात -११२ विद्यार्थी , भांबर्डे येथील विद्या विकास विद्यालयात –३९ विद्यार्थी , मळवली , भाजेतील श्रीमती शांतीदेवी जी.गुप्ता कनिष्ठ महाविद्यालयात -३९, कामशेत येथे तुळसानी कनिष्ठ महाविद्यालयात -३१ विद्यार्थी बसले आहेत. शिवाय द.पु.मेहता कनिष्ठ महाविद्यालयात केंद्रावर इतर कनिष्ठ महाविद्यालयाचे रायवूड कनिष्ठ महाविद्यालयाचे -०७, आॕक्झिलियन काँन्व्हेःट हायस्कूलमधील -०९, लीली कनिष्ठ महाविद्यालयाचे -१३ आणि आॕलसेंट चर्च विद्यालयाचे -१० असे ३९ विद्यार्थी बारावीचे परिक्षेला बसलेले आहेत,अशी माहिती केंद्र प्रमुख आर.डी.दरेकर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्य लिपिक भगवान आंबेकर यांनी दिली.

या परीक्षा केंद्रावर दोन पोलिस अधिकारी व कर्मचारी असा बंदोबस्त ठेवलेला असून सर्व परीक्षार्थींना मास्कचा वापर करणे , सोशल डिस्टंटीँगचे पालन करणे , तसेच सॕनिटायझरचा वापर करणे असे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.इतर परीक्षा केंद्रावर उपकेँद्रप्रमुख यांचेकडून परीक्षेचे व्यवस्थापन पाहिले जात आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!