ताज्या घडामोडी

नोर्मा ग्रुप कंपनीत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त शपथविधी संपन्न

नवलाख उंबरे : येथील एमआयडीसी येथील नोर्मा ग्रुप कंपनी येथे ५१ वा राष्ट्रीय सुरक्षा दिन/सप्ताह साजरा करण्यात आला या दिनानिमित्त नोर्मा कंपनीमध्ये सुरक्षा ध्वजाचे ध्वजारोहण तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. रणजीत सावंत यांच्या हस्ते करून सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेची शपथ घेतली.

या प्रसंगी कंपनीचे एच आर मॅनेजर श्री. विवेक पवार यांनी राष्ट्रीय सुरक्षा दिन /सप्ताहाचे महत्व समजावून सांगताना आपण राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह केव्हापासून साजरा करत आहोत याचे महत्त्व व त्याचे कामगारांना होणारे फायदे याचे स्पष्टीकरण दिले. तसेच सर्व कामगार कर्मचाऱ्यांना सुरक्षितता नियमांचे पालन करावे व सर्वांनी सुरक्षिततेचा अंगीकार करावा आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.त्याप्रसंगी एम आय डि सी चे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत साहेब यांनी रोड सेफ्टी बाबत कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व रोडवर वाहन चालविताना नक्की वाहन कसे चालवावे व कोणती खबरदारी घ्यावी याविषयी कामगारांना माहिती दिली.

या प्रसंगी कंपनीचे उत्पादन विभागाचे मॅनेजर विकास तुषीर ,लाईन सुपरवायझर भूषण निमगुळकर, प्रशांत दांडगे, स्टोअर चे वरिष्ठ अधिकारी तमन्ना बरगुडा आदी पदाधिकारी व कामगार वर्ग उपस्थित होते. त्यामध्ये कामगार वर्गाने चांगला प्रतिसाद देऊन सुरक्षेविषयी सर्व त्या खबरदारी घ्यावी असे श्री विकास तुशीर यांनी सांगितले आहे.

कामगार वर्गाचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा यासाठी कंपनीने दि. 4 मार्च ते 11 मार्च या सप्ताहामध्ये विविध स्पर्धा/कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!