ताज्या घडामोडी

झेडपी व महापालिका निवडणुका लांबणीवर ; आत्ताची प्रभाग रचनाही रद्द

तळेगाव : महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका सहा महिने लांबणीवर पडल्या आहेत. तसेच आत्ताची प्रभाग रचना रद्द करण्यात आली आहे.राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मांडलेले विधेयक दोन्ही सभागृहात कोणतीही चर्चा न करता मंजूर झाले. ओबीसींच्या आरक्षणात शिवाय निवडणुका होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ओबीसींचे राजकीय आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांची होती. या पार्श्‍वभूमीवर आज विधेयक पास झाल्याने निवडणुका लांबणीवर पडणार आहेत. या निवडणुकांच्या तारखा ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारला मिळणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!