ताज्या घडामोडी

एकविरा कृति समितीतर्फे इंद्रायणीनदीचे पाञ खोलीकरण करण्यासाठी १४ मार्चला बेमुदत उपोषणाचा इशारा

 

लोणावळा : एकविरा कृति समितीतर्फे इंद्रायणीनदीचे पाञ खोलीकरण करण्यासाठी ता.१४ मार्चला बेमुदत उपोषणाचा इशारा तहसिलदार यांना निवेदनातून दिला आहे. एकविरा कृति समिती अध्यक्ष भाई भरत मोरे आणि सर्व शेतकऱ्यांनी नायब तहसिलदार श्री चाटे यांचेकडे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ता.२१ फेब्रुवारी २०१८ पासून आजपर्यंत शासनास एकविरा कृति समितीतर्फे निवेदने देण्यात आली आहेत. आपल्या कार्यालयाकडून सातत्याने तोंडी सांगितले जाते की नदीपाञ खोल केले जाईल, परंतु आपल्याकडून या निवेदनातील बाबत शेतकऱ्यांची कधीही बैठक घेतली नाही. उलट टपाली आपल्याकडून पञव्यवहार केला नाही.याची आम्हाला खंत वाटते. तरी या निवेदनातून आपणास विनंती करण्यात येते की , यावर्षी इंद्रायणीनदी पाञ खोल करण्यात यावे. यासाठी राज्यसरकारने आपणास अधिकार दिले आहेत.आम्ही यंत्रसामग्रीचा वापर करून त्यास लागणारे खर्चास आपण तरतूद करावी व नदीपाञात असलेला गाळ काढण्यास त्वरीत परवानगी द्यावी. नदीपाञ खोल न केल्यामुळै शेतक-यांचे शेतीतील पिकांचे नुकसान होत आहे, कारण सातत्याने पाऊस पडल्यामुळे व टाटाची धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर टाटा कंपनी धरणातून पाणी सोडते. त्याच पाण्याच्या तीव्रतेने पिकांची व जमिनीची हानी होते, कारण नदीपाञ उथळ असल्याने त्याचा प्रवाह लांबपर्यत पसरला जातो.पूर ओसरल्यावर नदीपाञात पाणी रहात नाही.आपण हेच नदीपाञ खोल केले;तर पूर येणार नाही व शेतक-यांचे नुकसान होणार नाही. तसेच रब्बी पिके घेण्यास शेतीला पुरेसे पाणी मिळेल.नदीपाञास खोल करणे , काळाची गरज आहे.तरी आपणास विनंती आहे,जर या अतिसंवेदनशील शेतकऱ्यांच्या हिताचा मागणीचा विचार केला नाही,तर सोमवार ता.१४ पासून मागण्या मान्य होईपर्यत आपल्या तहसिलदार कार्यालयासमोर बेमुदत (आमरण ) उपोषणास शेतकरी बसणार आहोत, याची आपण नोँद घ्यावी , त्याच्या होणाऱ्या दुष्परिणामास शासन म्हणून आपण जबाबदार , ही विनंती .असे म्हटले आहे.

निवेदनावर श्री एकविरा कृति समिती अध्यक्ष भाई भरत मोरे , दिपकशेठ हुलावळे , बाळासाहेब भानुसघरे , मिलींद बोञे , किरण हुलावळे , गुलाब तिकोणे , अरूण भानुसघरे , नंदकुमार पदमुले , दत्ताञेय ढाकोळ , संदिप आंबेकर , भाऊसाहेब मावकर , भरतशेठ येवले, भागुजी केदारी , चंद्रकांत केदारी , रघुनाथ दाभाडे , ज्ञानदेव केदारी , सुरेश केदारी , बाळासाहेब नाणेकर , नारायण आंबेकर , मनिषा आंबेकर , एम आर.गुजर,दत्ता दळवी आदींच्या सह्या आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!