ताज्या घडामोडी

काइझेन आणि एस.एम.ई.डी. स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद 

फोरमच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदूलकर व आदीच्या हस्ते विजेत्याच्या सन्मान

चिंचवड : भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटरमध्ये क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीने विविध उद्योग संस्थेमधील कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष काम करताना येणार्‍या अडीअडचणीवर मात करणे, कर्मचार्‍यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुण प्रकाशात आणणे, त्यांच्या क्षमतेच्या उपयोग करणे व ते करीत असलेले काम पूर्ण करण्यास लागणारा कालावधी, सरासरी काम किती उशिरा होते. करीत असलेल्या कामाचा जॉब सेटअप कमी वेळेत कसा करता येईल., कामात नवीन शोधापेक्षा छोटीसी सुधारणा (काईझेन) जास्त सोपी महत्वाची व परिणामकारक असते. यासाठी काइझेन व एस.एम.ई.डी. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

उद्योग संस्थेतील वस्तू निर्मितीला होणारा खर्च कमी करता येईल का? गुणवत्तापूर्व निर्मिती करून स्पर्धेच्या युगात ग्राहकांना त्यांना परवडेल या दरात वस्तू उपलब्ध करून देण्याचा सर्वच उद्योग संस्था प्रयत्न करीत असतात. यासाठी उद्योग संस्थेमधील कर्मचार्‍यांसाठी फोरमच्या वतीने व्यासपीठ निर्माण करून या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात भारतभरातील 44 उद्योग संस्थांकडून 118 नामांकन प्राप्त झाले. त्यात 24 केस स्टडीने प्रत्यक्ष सादरीकरण केले होते. त्याचे मूल्यमापन क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे, पदाधिकारी अनंत क्षीरसागर, धनंजय वाघोलीकर आणि परवीन तरफदार यांनी केले. विजयी उद्योग संस्थेतील कर्मचार्‍यांच्या यावेळी फोरमच्या पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदूलकर आदींच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे संयोजन चंद्रशेखर रुमाले व प्रकाश यार्दी यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!