ताज्या घडामोडी
तळेगाव व लोणावळा नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर
तळेगाव : लोणावळा व तळेगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2022 साठी प्रभाग रचनेचे प्रारूप आराखडे व नकाशे आज प्रसिद्ध करण्यात आले.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आज नगर परिषद कार्यालयाच्या बाहेर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली. यावर 17 मार्च दुपारी तीन वाजेपर्यंत मुख्याधिकारी कार्यालयात कोणाची हरकत व सूचना असल्यास सादर करायची आहे. हरकती व सूचना धारकांना सुनावणीसाठी स्वतंत्रपणे बोलवण्यात येणार आहे.नकाशे व प्रभाग रचना पहावयाची असल्यास कार्यालयीन वेळेत येऊन पहावी असे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.