ताज्या घडामोडी

तरूणांनी जबाबदारीने वाहने चालवावीत – संजय क्षीरसागर यांचे आवाहन

चिंचवड : तरुणांनी जबाबदारीने वाहने चालवावीत असे आवाहन चाकण येथील महिंद्रा हेवी इंजिनिअरिंग समूहाचे प्रकल्प प्रमुख संजय क्षीरसागर यांनी केले.    राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहच्या निमित्ताने चिंचवड येथील कमला शिक्षण संकूल संचलित प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या वतीने आयोजीत व महिंद्रा हेवी इंजिनिअरींग (चाकण) यश फौंडेशन (पुणे) यांच्या विशेष सहकार्याने वाहतूक सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.   सहभागी विद्यार्थी व उद्योग समुहाचे प्रकल्प प्रमुख संजय क्षीरसागर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी एम.बी.ए. विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगांवे, उद्योगसमुहाचे हेमंत चव्हाण, यश फौंडेशनचे अध्यक्ष रवि पाटील उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयाच्या 110 विद्यार्थ्यानी हातात जनजागृती विषयांचे फलक घेवून काळभोरनगर, आकुर्डी ते महाविद्यालयापर्यंत जनजागृती फेरी काढण्यात आली. वेगवेगळ्या कारणाने होणार्‍या अपघाताची एकत्रित माहिती संकलन करून नागरिकांमध्ये व वाहनचालकात जनजागृती व्हावी यासाठी महाविद्यालयात व आकुर्डी येथील खंडोबा चौकात पथनाट्य सादर केले. त्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रकल्प प्रमुख संजय क्षीरसागर पुढे म्हणाले, अनेक उद्योग समुह सामाजिक जाणीवेतून समाजपयोगी कामे करण्यात कार्यरत आहे. महिला उद्योग समुह देखील ग्रामीण व शहरी भागात कार्यरत आहे. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी तरूणांनी आपले वाहन जबाबदारीने चालविणे महत्वाचे असून वाहतूक नियमाचे सर्वांनीच काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे. चौकात वाहतूक पोलिस असेल तर नियमाचे पालन होताना दिसते. ते नसतील तर अनेक वाहनचालक नियमाचे उल्लंघन करतात. यासाठी अशाचे प्रबोधन होणे आज आवश्यकच झाले आहे. पथनाट्य, मानवी साखळी व जनजागृती अभियानात मुलींचा सहभाग मोठ्या संख्येने आहे ही कौतुकास्पद बाब आहे. मिरवणूकीत प्राध्यापक वर्गाने सहभाग नोंदविला.

यावेळी एमबीए विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगांवे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले. प्रा. नीजी साजन व विद्यार्थी अंजली बालकृष्णन,अनुप देशपांडे, मिताली पाटील, शर्वरी कुलकर्णी यांनी पथनाट्य व जनजागृती अभियानासाठी मोलाची मदत केली. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या प्रोत्साहनामुळे सदर उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमांचे सुत्रसंचालन प्रा. नीजी साजन यांनी केली. आभार डॉ. श्वेता जैन यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!