ताज्या घडामोडी

पर्यावरण संवर्धन समिती ECA पुणे यांच्या वतीने मावळ तालुक्यातील ३७ दुर्गम शाळांना लॕपटाॕपचे वाटप

गहुंजे : सोमवार दि.१४ मार्च रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गहुंजेच्या प्रांगणात ‘एक हात मदतीचा,सामाजिक बांधिलकी जपण्याचा’ या कार्यक्रमांतर्गत सांगावडे शाळेचे मुख्याध्यापक संदिप सकपाळ यांच्या प्रयत्नांतून मावळ तालुक्याच्या दुर्गम भागातील शाळांमधून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख व्हावी व या तंत्रज्ञान युगातील नवनवीन कल्पना आत्मसात व्हाव्यात या हेतूने पर्यावरण संवर्धन समिती ECA पुणे यांच्या वतीने पंचायत समिती कार्यालय मावळ यास १ व ३७ जिल्हा परिषद शाळांना प्रत्येकी १ लॕपटाॕपचे वाटप करण्यात आले.या पूर्वी १७ शाळांना अशा एकूण ५५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना लॕपटाॕपचे वाटप करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यावरण संवर्धन समिती ECA च्या संस्थापक अध्यक्षा सन्मा.विनिता दाते मँडम होत्या.कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती पूजनाने करण्यात आली.दारुंब्रे केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष कांबळे सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.प्रमोद भोईर सरांनी उपस्थितांचे शाब्दिक स्वागत करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

मावळ पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना ECA संस्थेचे आभार मानून या पुढील काळात पर्यावरण संवर्धन समितीच्या माध्यमातून मावळ तालुक्यात पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यास पं.स.मावळ नेहमीच सहकार्य करील अशी ग्वाही दिली.
शिक्षण विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज यांनी शिक्षकांना लँपटॉपचा वापर अध्ययन अध्यापनासाठीच करण्याचे सांगितले.उपस्थित शिक्षकांमधून मनोगत व्यक्ती करताना राज्यआदर्श शाळा कान्हे शाळेच्या मुख्याध्यापिका शाभाताई वहिले यांनी अत्यंत मोलाची व उपयुक्त अशी मदत दिल्याबद्दल ECA संस्थेचे व सकपाळ सरांचे मनपूर्वक आभार मानले.येवलेवाडी शाळेचे मुख्याध्यापक मनोज भांगरे सरांनी ECA संस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल आभार मानले.
पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने सन्मा.विनिता दाते मँडम,डॉ.आशा राव , हिरामण भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केले व शिक्षकांना लँपटॉचा वापर केवळ अध्ययन अध्यापनासाठी करण्याचे आवाहन केले.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुसाणे शाळेचे शिक्षक प्रमोद भोईर यांनी केले.तर उपस्थितीतांचे आभार गहुंजे शाळेचे शिक्षक गोरक्षनाथ खामगळ यांनी मानले.

कार्यक्रमास ECA संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ.विनिता दाते मँडम,मावळ पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे,शिक्षण विस्तार अधिकारी सुदाम वाळूंज , PCMC वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य हिरामण भुजबळ,ECA संस्थेचे सदस्य डॉ.आशा राव,विजय राव,दिपक सकपाळ,हर्षदा पाटील,जयंत पाटील,गोरक्षनाथ सानप,सौ.अनघा दिवाकर, श्री.अनिल दिवाकर, सुनिता जुन्नरकर,मिनाक्षी मेकरकर, कल्पना तळेकर,गहुंजे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रोहिणी शेळके,सदस्या शारदाताई बोडके तसेच ३७ शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!