ताज्या घडामोडी

शेतकरी हितासाठी इंद्रायणीनदी पाञ खोलीकरण मागणीसाठी‌ सुरू असलेले उपोषण मागे

तहसिलदार बर्गे यांचेसह गणेश खांडगे यांचेसह पाटबंधारे खात्याचे अभियंता खाडे यांचे उपस्थितीत सोडले उपोषण

मावळ : शेतकरी हितासाठी इंद्रायणीनदी पाञ खोलीकरण मागणीसाठी सुरु असलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे. तहसिलदार बर्गे यांचेसह गणेश खांडगे यांचेसह पाटबंधारे खात्याचे अभियंता खाडे यांचे उपस्थितीत आज सकाळी सुरू केलेले बेमुदत उपोषण सायंकाळी सव्वा सहा वाजता सोडले.

शेतकरी बंधू आणि भागिनींनी यावेळी मोठ्या संख्येने गर्दी करून उपोषणास पाठिंबा दिला होता. श्री. एकविरा कृती समितीच्या वतीने दिनांक १४ मार्च रोजी सकाळी १० वा.शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषणस बसलेल्या नऊ शेतकरी व पदाधिकारी आणि असंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते.

सदर उपोषण सोडण्यासाठी व मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मावळ तहसिलदार मधुसुदन बर्गे, मावळ पाटबंधारे खात्याचे अभियंता श्री. खाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माऊली सोनवणे , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष दिपकशेठ हुलावळे,खरेदी विक्री संघ माजी सभापती बाळासाहेब भानुसघरे, उद्योजक व माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष राउत, कार्लाचे उपसरपंच किरण हुलावळे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरदराव हुलावळे , शिवसेना उपतालुकाप्रमुख सुरेशशेठ गायकवाड, मनिषाताई आंबेकर, भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सायलिताई बोत्रे, जिल्हापरिषद सदस्या आलकाताई धानिवले,आदि मान्यवरांच्या उपस्थित चर्चा होवून खालील मागण्यांणवर चर्चा झाली. इंद्रायणी नदीला मिळणारे ओढ्यातील पावसाळ्यापुर्वी गाळ काढणे, वलवण टाटा धरणातील पाणी इंद्रायणी नदीत सोडण्याबाबत दिनांक २२ मार्च रोजी मिटींग घेण्याचे मान्य केले आहे.

लेखी पत्र स्विकारल्या नंतर उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी उपोषणास श्री एकविरा कृति समिती अध्यक्ष भाई भरत मोरे , भाजेचे माजी सरपंच नंदकुमार पदमुले , पाटणचे माजी सरपंच गुलाब तिकोणे , माजी सरपंच विष्णू गायखे , माजी जिल्हा परिषद सदस्य मिलींद बोञे, माजी सरपंच अरूण भानुसघरे , माजी सरपंच काळुराम थोरवे आणि सुनिल गुजर आदी शेतकरी उपोषणास बसले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!