ताज्या घडामोडी

सातबारा नोंदीसाठी लाच घेताना तलाठी महिलेस रंगेहात पकडले

चाकण : पाच वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा नोंदी साठी लाच स्वीकारणाऱ्या तलाठी महिलेस पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि 16) रंगेहात पकडले. चाकण मधील आंबेठाण येथील तलाठी कार्यालयात अँटी करप्शन ब्युरोच्या पुणे विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

वर्षा मधुकर धामणे (वय 45 रा. तलाठी सज्जा, म्हाळुंगे, अतिरिक्त कार्यभार आंबेठाण, ता. खेड जि. पुणे) असे एसीबीने कारवाई केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. खाजगी व्यक्ती अकबर (पूर्ण नाव पत्ता उपलब्ध नाही) याच्यावरही चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (पुणे )सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन) यांनी दिलेल्या माहितीनुसार 32 वर्षे तक्रारदार यांनी सन 2017 मध्ये म्हाळुंगे गावच्या हद्दीत जमीन खरेदी केली. खरेदी केलेल्या जमिनीचा सातबारा नोंदीसाठी तलाठी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारूनही नोंदीचे काम होत नव्हते. त्यासाठी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारल्यानंतर खाजगी व्यक्ती अकबर यांच्याकडून सातबारा नोंदीसाठी सुरुवातीला एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर तलाठी धामणे यांनी तीस हजार रुपयांची मागणी करत तडजोडीअंती वीस हजार रुपये बुधवारी( दि 16) स्वीकारले. त्यावेळी एसीबीच्या पथकाने त्यांच्यावर कारवाई केली.

लाचलुचपत प्रतिबंधक पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!