ताज्या घडामोडी

लोणावळा शहरात राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांना सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत प्रवेशबंदी

लोणावळा : लोणावळा शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून जाणाऱ्या अवजड वाहनांना सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. लोणावळा शहरातील वाहतूक कोंडी टाळावी यासाठी तसेच होणाऱ्या अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांनी ही अधिसूचना जाहीर केली आहे.

लोणावळ्यातील जागरूक नागरिकांनी या संदर्भात काही दिवसांपूर्वी आंदोलन करत जड वाहनांना प्रवेश बंदीची मागणी केली होती. या मागणीनुसार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर नुसार जिल्हाधिकारी यांनी सदरची अधिसूचना जाहीर केली असून 18 मार्च पासून याची अंमलबजावणी करावी असे आदेशात म्हटले आहे.

लोणावळा शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी व‌ अपघात नित्याची समस्या झाली आहे. मागील महिन्यात या महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन तरुणांनी आपला जीव गमावला होता.त्यानंतर येथील जागरुक नागरिकांनी एकत्र येऊन काही दिवसांपूर्वी सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले. यावर मावळचे तहसीलदार व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता, लोणावळा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक यांनी आंदोलनकर्त्यांना भेटून लेखी आश्वासन दिले होते.

जागरूक नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांच्या याआधी सूचनेचे स्वागत केले आहे. तसेच स्थानिक प्रशासन या अधिसूचनेची कडक अंमलबजावणी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!