ताज्या घडामोडी

मि. युनिव्हर्स शरीर सौष्ठव स्पर्धेत मावळ तालुक्यातील खेळाडू करणार देशाचे प्रतिनिधित्व

मावळ :  दि 15 ते 17 एप्रिल 2022 रोजी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस यांच्या मान्यतेने अंतराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयबीबीएफएफ आणि एएफबीएफचे डॉ. संजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये मावळ तालुक्यातून अजित पसारी,अविनाश खैरे, आकाश लिमाले, मोहसिन शेख, प्रफुल्ल रोकडे, रेहमान नालबंद आणि चॅम्पियन आॅफ चॅम्पियन किताब  विजेता वसीम शेख व मावळ तालुक्यातील खेळाडू स्पर्धेचे प्रतिनिधित्व करणार आहेत. देशासाठी खेळणाऱ्या या सामान्य कुटुंबातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांच्या  प्रशिक्षकांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!