ताज्या घडामोडी
ज्येष्ठ उद्योजक अरुण काळोखे यांचे निधन
तळेगाव : काळोखे परिवारातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अरुण दगडुजी काळोखे (वय ७२ वर्ष) यांचे आज (शनिवार) दि. १९ मार्च रोजी सकाळी ७ः०० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
तळेगाव दाभाडे मधील आरोही रीसॉर्ट, इशा हॉटेल, कुलदीप हॉटेलचे ते मालक होते. यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला होता. बालविकास विद्यालयाच्या स्नेहवर्धक मंडळाचे संचालक आणि माजी अध्यक्ष होते.
त्यांच्या पश्चात पत्नी माधुरी, मुलगा अमित, मुलगी अमृता धनकवडे, नातवंडे, दोन भाऊ, पुतने असा परिवार आहे.