ताज्या घडामोडी

नायलॉनच्या जाळ्यात अडकलेल्या नागास जीवदान; अथक प्रयत्नानंतर सर्पमित्रांना यश

दहिवली : येथे अतिष मराठे यांच्या घराशेजारी मुलांनी क्रिकेट खेळण्यासाठी बनवलेल्या मैदानावरील नायलॉनच्या नेटमध्ये एक भलामोठा 5 फूट लांबीचा नाग अडकून पडलेला तेथे खेळत असलेल्या मुलांना दिसला,अतिष मराठे या तरुणाने तत्परता दाखवत शिवदुर्ग ऍनिमल रेस्क्युचे दिगंबर पडवळ यांना संपर्क करून नाग पकडण्यासाठी बोलावले.

त्यावेळी शिवदुर्ग ऍनिमल रेस्क्यु मित्रचे सर्पमित्र दिगंबर पडवळ,विशाल केदारी त्या ठिकाणी पोचले. लहान जाळे व सापाने केलेल्या हालचालीमुळे साप पूर्णपणे अडकून पडला होता.रात्र झाल्याने उजेडाचा अभाव होता ,नागाने निघण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे त्याला थोडी जखम देखील झाली होती त्यामुळे तो प्रतिकार करण्यासाठी पूर्ण चिडलेल्या अवस्थेत हल्ला करत होता .पाहताक्षणी असे वाटत होते की, त्याचे वाचणे अवघड आहे. पण, प्रयत्न करणे महत्त्वाचे होते. त्यामुळे सर्व “टीम’ने कात्री व ब्लेडच्या साह्याने हळूहळू जाळ्याचा एक एक धागा तोडून वेगळा करण्यास सुरुवात केली.१५ मिनिटाच्या प्रयत्नानंतर नागाला नायलॉनच्या नेटमधून पूर्णपणे मोकळा केला त्याला झालेल्या जखमेवर प्राथमिक उपचार करून त्याला सुरक्षित ठिकाणी सोडून दिला.सर्पमित्रांनी केलेल्या तत्परतेमुळे नागाला जीवदान मिळाले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!