ताज्या घडामोडी

मावळ तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी किशोर सातकर यांची निवड

वडगाव : मावळ तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी किशोर भाऊ सातकर यांची निवड करण्यात आली.वडगाव येथील पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश भाऊ खांडगे यांनी निवडीचे पत्र दिले. सातकर यांनी पक्षाची विविध पदे भुषविली आहेत .तसेच कान्हे नायगाव ग्रामपंचायतीचे मा.उपसरपंच अशा विविध पदावर  कामाचा ठसा उमटवला आहे. या सर्व बाबींचा विचार करून या पदासाठी त्यांची निवड करण्यात आली.

या वेळी ते आपल्या मनोगतात म्हणाले की, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी समाजातील सर्व  घटकांना बरोबर घेऊन काम केले जाईल.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश भाऊ खांडगे, मावळ तालुक्याचे आमदार सुनील (आण्णा ) शेळके ,मा. मंत्री मदन जी बाफना ,मा. आमदार कृष्णराव भेगडे, मा. अध्यक्ष बबनराव भेगडे, विठ्ठलराव शिंदे ,दिपक हुलावळे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले ,मा.युवक अध्यक्ष कैलास भाऊ गायकवाड व मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!