ताज्या घडामोडी

राजकारणात निष्ठा वाढवून आनंद मिळवावा – माजी मंत्री मदन बाफना

वडगाव : राजकारणात निष्ठेला महत्व आहे.त्यामुळे निष्ठा वाढवून राजकारणात आनंद मिळवावा असे मत माजी मंत्री मदन बाफना यांनी वडगाव मावळ येथे झालेल्या कार्यक्रमात मांडले.

माजी मंत्री मदन बाफना व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच गणेश खांडगे यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात बाफना बोलत होते.

यावेळी बोलताना माजी आमदार कृष्णराव भेगडे म्हणाले लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या पुरोगामी विचारांची धुरा गेली पन्नास वर्षे सांभाळली. पक्षासाठी निष्ठेने केलेल्या सेवेचे फळ म्हणून पुणे स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेवर बिनविरोध निवडून येण्याची संधी मिळाली.

आमदार सुनील शेळके म्हणाले मावळच्या विकासासाठी 960 कोटींचा निधी मिळवला.लवकरच एक हजार कोटींचा टप्पा पार करण्याचा मानस आहे. तसेच अडीच वर्षात 70 योजना आणल्या असेही ते म्हणाले.

गणेश खांडगे यावेळी बोलताना म्हणाले ‘घर तेथे कार्यकर्ता, गाव तेथे राष्ट्रवादी’ही संकल्पना घेऊन तालुक्यातील घराघरात पक्ष पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पक्ष संघटना वाढीसाठी काम करणार आहे.

यावेळी बबन भेगडे म्हणाले पक्ष संघटना वाढीसाठी काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे.

याप्रसंगी माजी आमदार कृष्णराव भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे ,माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अशोक भेगडे ,माजी सभापती विठ्ठल शिंदे ,राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सुवर्णा राऊत, नगरसेवक व तळेगाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश काकडे, कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, नगरसेवक सुनील ढोरे ,लोणावळा महिला शहराध्यक्ष मजुंश्री वाघ, नगरसेविका माया चव्हाण, वैशाली दाभाडे, सुभाष राक्षे, नरेंद्र ठाकूर, तुकाराम भोंडवे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी प्रास्ताविक केले .राजू खांडभोर यांनी सूत्रसंचालन केले.तर आभार राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सुवर्णा राऊत यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!