ताज्या घडामोडी

सामुदायिक विवाह सोहळा समिती अध्यक्षपदी सुनिल शिंदे यांची निवड

24 एप्रिलला होणार सोहळा

वडगाव : येथील स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या अध्यक्षपदी सुनिल शिंदे यांची तर कार्यप्रमुखपदी अर्जुन ढोरे यांची निवड करण्यात आली आहे. यावर्षीचा सोहळा दि.24 एप्रिल रोजी पार पडणार आहे.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी राजेंद्र वहिले, विलास दंडेल, अरुण वाघमारे, विवेक गुरव, अतुल राऊत, गणेश विनोदे, अनिल कोद्रे, शंकर ढोरे, रोहिदास गराडे, काशिनाथ भालेराव, मंगेश खैरे, अजय धडवले, महेश तुमकर, विनय लवंगारे, गणेश झरेकर, अक्षय बेल्हेकर, संतोष निघोजकर,प्रथमेश घाग, कार्तिक यादव उपस्थित होते.

गणेश गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे सामुदायिक विवाह सोहळा होऊ शकला नाही. तसेच महागाईमुळे अडचणीत आलेले सर्वसामान्य नागरिक व सध्या पुन्हा सुरू झालेल्या लग्नाचा डामडौल या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कुटुंबांना आधार मिळावा या उद्देशाने या वर्षी विवाह सोहळा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

यावर्षीचा सामुदायिक विवाह सोहळा हा दि.24 एप्रिल रोजी संपन्न होणार असून नियोजित जोडप्यांना संपूर्ण पोशाख, संसारोपयोगी भांडी, वऱ्हाडी मंडळींची जेवणाची व्यवस्था, नवरदेवाची मिरवणूक आदींसह विवाह सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

अध्यक्ष – सुनील शिंदे, कार्यक्रमप्रमुख – अर्जुन ढोरे, उपाध्यक्ष – सदाशिव खाडे, सोमनाथ धोंगडे, सचिव- शरद ढोरे,सहसचिव – संजय दंडेल, खजिनदार – अनिल कोद्रे, सहखजिनदार – सुनील दंडेल

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!