ताज्या घडामोडी
इंटरनॅशनल भजन सुखसेवा मिशनच्या वतीने 47 व्या महाशक्तीपीठ महोत्सवाचे आयोजन
दिल्ली : इंटरनॅशनल भजन सुखसेवा मिशनच्या वतीने तीन दिवसीय महाशक्ती पीठ महोत्सवाचे आयोजन 25, 26 व 27 मार्च रोजी दिल्ली येथे करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे 47 वे वर्ष आहे.
शुक्रवार (दि. 25 मार्च) रोजी ध्वजारोहण सोहळा हरिद्वार गुरुग्राम येथे पार पडेल. तर ( दि. 26 मार्च) रोजी योग, प्रार्थना, ध्यान, सुंदरकांड पाठ, कीर्तन व प्रवचन याचे आयोजन वसंत कुंज दिल्ली येथे करण्यात आले आहे.
रविवारी महा शक्ती पीठ नवी दिल्ली येथे पूजन व अभिषेक तसेच देवीला 56 भोग प्रसाद दाखवला जाईल. यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.