ताज्या घडामोडी

पवना डॅममध्ये बुडून एकाचा मृत्यु

पवनानगर : येथे आज दुपारी पवना डॅममध्ये बुडून एका इसमाचा  मृत्यू  झाला आहे.

राम लक्ष्मण पवार (वय 25, रा.वाघेश्वर)असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

सदर व्यक्ती कामासाठी निघाला असता डोक्यावरती मुलगा व बरोबर बायको होती.नदी ओलांडताना खोलीचा अंदाज न आल्यामुळे व नदीपात्रामध्ये गाळ असल्यामुळे तो बुडाला मात्र बायको व मुलगा सुखरूप वाचला.

सदर घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ व शिवदुर्ग मित्र लोणावळा यांना पाचारण करण्यात आले.वन्यजीव रक्षक मावळ संस्था व शिवदुर्ग मित्रचे निलेश गराडे ,भास्कर माळी,ओंकार भेगडे ,आकाश पवार, बाबू चव्हाण, काळुराम पवार,अविनाश कार्ले,वैभव वाघ व जवळपासचे ग्रामस्थ यांनी साधारण एक ते दिड तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.मृतदेह शवविच्छेदनासाठी कामशेत येथे पाठवण्यात आला आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!