ताज्या घडामोडी
निवृत्त पोलीस उप अधीक्षक दिलीप अर्जुनराव शिंदे यांचे निधन
पुणे : निवृत्त पोलीस उप अधीक्षक दिलीप अर्जुनराव शिंदे यांचे वयाच्या 69 व्या वर्षी अल्पशा आजाराने काल पुणे येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दि. 4 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वा वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत.
दिलीप शिंदे यांनी पुणे शहर, पुणे ग्रामीण, कोल्हापूर, राज्य वाहतूक शाखा अश्या वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 36 वर्षे नोकरी केली असून सन 2011 रोजी ते निवृत्त झाले होते.अत्यंत अभ्यासू व कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांचा पोलीस खात्यात लौकिक होता. त्यांचे उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते.