ताज्या घडामोडी

कामशेट खिंडीत भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

कामशेत : कामशेत खिंडीत आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे.

राजेंद्रकुमार देवेंद्रकुमार जैन (वय 44, रा. कळवा, ठाणे) व औतार गुरूदयाल सिंग सेहेरा (वय 50 रा. कोपरी, ठाणे) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर नितेश कुमार देवेंद्रकुमार जैन हे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सोमवारी (दि. 4 )पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कंटेनर पलटी झाला व मुंबई लेन वर गेला. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या काय क्रमांक एमएच 46 P 3634 या गाडीस कंटेनर धडकल्याने हा अपघात झाला.जखमींवर कामशेतमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!