ताज्या घडामोडी

महागाईच्या विरोधात मावळ युवासेनेचे थाळी बजाओ आंदोलन

लोणावळा : केंद्र सरकारने केलेल्या महागाईविरोधात युवा सेनेच्या वतीने कान्हे येथे थाळी बचाव आंदोलन करण्यात आले.

थाळी वाजवून या वेळी केंद्र सरकारचे विरोधात उपरोधिक आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर, युवासेना तालुका अधिकारी श्याम सुतार, पुणे विद्यापीठ युवा सेना उपाध्यक्ष विशाल हुलावळे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, युवासेना उपजिल्हाप्रमुख गिरीश सातकर, युवा सेना तालुका अधिकारी श्याम सुतार, पुणे विद्यापीठ युवा सेना उपाध्यक्ष विशाल हुलावळे, शिवसेना उपतालुका प्रमुख मदन शेडगे, संघटक यशवंत तुर्डे, कामशेत शहर प्रमुख सतीश इंगवले, प्रवीण ढोरे, सोपान धिंदळे, मयुर थोपटे, सोपान येवले, दिनेश शिंदे, राजेश शिंदे,सचिन शिंदे, अमित शिंदे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!