ताज्या घडामोडी

श्री एकविरा दुर्गापरमेश्वरी जोगेश्वरी येथे सामुदायिक विवाह सोहळा संपन्न.

लोणावळा: (प्रतिनिधी) सामुदायिक विवाह सोहळ्यात सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी , आजी माजी आमदार व्यासपीठावर आल्याचे चिञ कार्ला येथील श्री एकविरा दुर्गा परमेश्वरी जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त पाहायला मिळाले . तेरा जोडप्यांचा विवाह या व्यासपीठावर हजारो नागरिक , महिला , व-हाडींसह शेकडो लोकप्रतिनिधी यांचे उपस्थितीमधे संपन्न झाले. यावेळी माजी राज्यमंञी बाळाभाऊ भेगडे आणि आमदार सुनिलआण्णा शेळके आदींसह
संत तुकाराम सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष बाप्पूसाहेब भेगडे , माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे , शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे , भाजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे यांनी स्वागत केले. जिल्हापरिषदेचे कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव आप्पा वायकर , नितीनशेठ मराठे , माजी पंचायत समिती सभापती राजाराम शिंदे , ज्ञानेश्वर दळवी , राष्ट्रवादीचे पदाधिकारी तुकाराम आसवले , सुभाष जाधव , खरेदी विक्री संघाच्या सभापती मनिषाताई आंबेकर , माजी सभापती व संचालक बाळासाहेब भानुसघरे , सचिव संघटना अध्यक्ष गणपत भानुसघरे , संत तुकाराम महाराज सेवा समिती अध्यक्ष भरतशेठ येवले, पुणे जिल्हापरिषद सदस्य अलकाताई गणेश धानिवले , पदाधिकारी सुभाष भानुसघरे , कार्लाचे उद्योजक संतोष मोरे ,बाळासाहेब येवले, संतोष गायकवाड , साईनाथ मांडेकर , आदी उपस्थित होते. यावेळी श्री एकविरा दुर्गापरमेश्वरी जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा समिती संस्थापक भाई भरत मोरे , संस्थापक मिलींद बोञे , दिपकशेठ हुलावळे , बाळासाहेब भानुसघरे , जितेंद्र बोञे , सन २०२२चे अध्यक्ष उपसरपंच किरणशेठ हुलावळे , नंदकुमार पदमुले , गुलाबराव तिकोणे , आदी उपस्थित होते.

वधुंसाठी पंधरा तोळे सोन्याचे दागिणे देणारे , मुंबई स्थित व श्री दुर्गा परमेश्वरी ट्रस्टचे ट्रस्टी सुरेशजी भगेरिया , तसेच संपूर्ण वराचा पोषाख सूट देणारे उद्योजक माजी नगराध्यक्ष सोमनाथ जांभळे , आग्रवाल ग्रूप मंबई याँनी वधूंचा संपूर्ण पोषाख दिल्याबद्दल त्यांचा स्मृतिचिन्ह व शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार आमदार सुनिलआण्णा शेळके व माजी मंञी बाळाभाऊ भेगडे यांचे हस्ते समितीकडून करण्यात आला. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दिपकशेठ हुलावळे , कार्लाच्या सरापंच दिपाली हुलावळे , लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर , विलासभाऊ बडेकर , देवलेचे माजी सदस्य बाळासाहेब आंबेकर , एकविरा युवक संघटना अध्यक्ष संतोष गायकवाड , औढोलीतील माजी सरपंच साईनाथ मांडेकर , उद्योजक काळूराम मालपोटे , राष्ट्रवादीचे पदाधिकारी नारायण ठाकर आदी उपस्थित होते. कार्ला विकास सोसायटी व भाजे विकास सोसायटी नवनिर्वाचित संचालक पंचक्रोशितील विविध गावचे सरपंच , उपसरपंच , सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी माजी राज्यमंञी बाळा भेगडे आणि आमदार सुनिलआण्णा शेळके यांचेसाह सर्व मान्यवरांनी तसेच वधुवरांना पंधरा तोळै सोन्याचे दागिणे देणाऱ्या , तसेच सर्व संसारोपयोगी वस्तू देणाऱ्या देणगीदारांचा सोहळा समितीतर्फे सत्कार करण्यात आला व त्यांच्याकडून असेच कार्य यापुढेही चालू राहावे , त्यांना उत्तम आरोग्य व आयुष्य , सुख , समाधान , संपत्ती मिळो , असे भाषणातून शुभेच्छा व्यक्त केल्या.  यावेळी शुभ आशीर्वाद ह.भ.प.तुषारमहाराज दळवी यांच्याकडून देण्यात आले. सर्व विवाहाचे पौराहित्यासाठी पाच ब्राम्हण यांनी केले. शिलाई मशीन मुंबईच्या श्री जैन यांचेतर्फे देण्यात आल्या.
संसारोपयोगी साहित्यात वधूसाठी मनगटी घड्याळ , फॕन, पर्स , बॕगा , तसेच वधुसाठी सोन्याचे गंठन ,कानातील कुडक्या , चप्पल , बूट , पूर्ण वर वधू पोषाख यांचा समावेश आहे. यावेळी श्री एकविरा दुर्गापरमेश्वरी जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा समितीतर्फे संस्थापक अध्यक्ष भाई भरत मोरे यांनी मनोगतात सांगितले , कोरोनाच्या दोन वर्षे कठीण काळानंतर हा विवाह सोहळा सर्व वर वधूंचे नातेवाईक व देणगीदारांचे सहयोगाने घडून आला आहे , विश्वस्त निमित्तमाञ आहे. असे सोहळे गावोगावी झाले , तर खूप मोठा खर्च वाचून वर वधू यांचे आयुष्यात कर्जबाजारीपणा येणार नाही. यावेळी स्वागत यावर्षी चे अध्यक्ष कार्लाचे उपसरपंच किरणशेठ हुलावळे यांनी केले. सूञसंचालन जितेंद्र बोञे आणि सुभाष भानुसघरे सर यांनी केले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!