ताज्या घडामोडी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे – मावळ ची नवीन कार्यकारिणी जाहीर.

तळेगाव दाभाडे: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. अध्यक्षपदी अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे – मावळ चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.सुरेश धोंडीबा धोत्रे यांची बिनविरोध निवड झाली. इतर कार्यकारिणी पुढील प्रमाणे

मा.श्री.गणेश काकडे – कार्याध्यक्ष, मा.श्री.बिजेंद्र किल्लावाला – उपाध्यक्ष, श्री विश्वास देशपांडे – प्रमुख कार्यवाह, श्री.प्रसाद मुंगी – सचिव ,श्री.नितीन शहा – खजिनदार. श्री भरतकुमार छाजेड – सहखजिनदार , तर श्री.विलासराव काळोखे,श्री.कैलास केदारी, श्री.सुरेश दाभाडे, श्री तेजस धोत्रे, श्री.हरिश्चंद्र गडसिंग ,डॉ.मिलिंद निकम,श्री.राजेश बारणे, डॉ.यशवंत वाघमारे ,श्री.सुखेंदू कुलकर्णी, श्री.संग्राम जगताप, श्री. श्रीप्रसाधन भरड, सौ.नयना डोळस याची कार्यकारिणी सदस्य पदी बिनविरोध निवड झाली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे विश्वस्त मा.श्री.सुरेश साखवळकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पहिले.

ही निवड पुढील पाच वर्षासाठी आहे असे सांगून निवडणूक अधिकारी मा. सुरेश साखवळकर यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!