ताज्या घडामोडी

येवला शिवसृष्टीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली २ मे रोजी भूमिपूजन*

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजन करण्यात येणार आहे.

येवला : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या येवला शिवसृष्टीचे सोमवार दि.२ मे २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजन करण्यात येणार आहे.

येवला हे ऐतिहासिक, धार्मिक व औद्योगिकदृष्ट्या महत्वाचे शहर असून महाराष्ट्राचे महावस्र पैठणीची निर्मिती याच शहरात होते. थोर स्वातंत्र्य सेनानी सेनापती तात्या टोपे यांची येवला ही जन्मभूमी असून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा याच येवले शहरात केली. पैठणीमुळे येवल्याची जगभर ओळख झाली असून पर्यटनासाठी अनकाई किल्ला त्याचप्रमाणे कोटमगाव येथील जगदंबा देवी मंदिर, विठ्ठल मंदिर, बोकटे येथील कालभैरव मंदिर, अंदरसूल येथील नागेश्वरी मंदिर हे प्रसिद्ध स्थळे येथे आहेत.येवला शहराच्या लौकीकात आणखी भर पडण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व शिवरायांच्या जीवनावरील ऐतिहासिक घटनांचे म्युनरल्सद्वारे शिवसृष्टी उभारण्यात येत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!