नविन समर्थ विद्यालय तळेगाव दाभाडे येथील १९८७ मधिल दहावीच्या बॅचचा कदमवाडी मावळ येथे गेट टुगेदर कार्यक्रम संपन्न.
नविन समर्थ विद्यालय तळेगाव दाभाडे येथील १९८७ मधिल दहावीच्या बॅचचा कदमवाडी मावळ येथे गेट टुगेदर कार्यक्रम संपन्न झाला.
कदमवाडी येथील गणेश मंदिरात केतकर मॅडम यांच्या हस्ते गणपतीची आरती करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.व जुन्या आठवणिंना उजाळा देत, सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या परिस्थीतीशी लढा देत कशा पध्दतीने शिक्षण पूर्ण केले व त्याचा फायदा समाज जिवनात स्वतःला, कुटुंबाला व समाजाला कसा झाला या बद्दल चर्चा करण्यात आली, शाळेतील मैत्री ही एकदम निखळमैत्री असते असे गौरवोद्गार काढण्यात आले. कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्य़ाच्या सर्व भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमा झाले होते. त्यानंतर सुरुची भोजनाचा सर्वानी अस्वाद घेतला कार्यक्रमाचे नियोजन विठ्ठल कदम, रोहिदास गायकवाड, बाळासाहेब भोसले रघुनाथ ठाकर, महामूनी, संजय पानसरे व गावकऱ्यांनी केले होते.