ताज्या घडामोडी

वस्तीच्या वरील उंच डोंगरात एक पाण्याचा स्त्रोत शोधून गावकर्यांच्या श्रमदानाने व देवराई संस्थेच्या खर्चाने विहीर खोदण्यात आली.

. आता फक्त पावसाची प्रतीक्षा...........

आता फक्त पावसाची प्रतीक्षा………..

कान्हे फाटा-बडेश्वर रस्त्यावर मोरमारवाडी पासून दोन हजार फुट उंच डोंगर रांगेत माऊची डोंगरवाडी ही चाळीस घरांची

आदिवासी वस्ती आहे.

वस्तीवरून आद्रा व ठोकळवाडी धरणे अतिशय विहंगम दिसतात. पावसाळ्यात दोन-अडीचशे इंच पाऊस झेलणारी ही वस्ती दरवर्षी फेब्रुवारीपासून पिण्याच्या पाण्यासाठी हवालदिल असते. 2010 चे पूर्वी धरणावरून डब्याने पाणी वर नेले जात असे. पाण्याच्या समस्येने काही परिवार शेतीवाडी गाव सोडून निघून गेले होते.

2010 ला वस्तीच्या वरील उंच डोंगरात एक पाण्याचा स्त्रोत शोधून गावकन्यांच्या श्रमदानाने व देवराई संस्थेच्या खर्चाने विहीर खोदण्यात आली. तशी ही विहीर सुद्धा वस्तीपासून लांबच झाली तरीही नाही पेक्षा बऱ्यापैकी दिलासा मिळाला. गेलेले परिवार पुन्हा आले. दहा वर्षात पंतप्रधान आवास योजने मुळे पक्की घरे झाली. गुरेढोरे वाढली. परत पाण्याची समस्या जाणवू लागली.

गावातील तरुण देवराई संस्थेकडे आले कायमस्वरूपी बक्कळ पाण्यासाठी ठोस उपाय योजना करा अख्खी वस्ती श्रमदानासाठी तयार आहे, अशी मागणी झाली. देवराई संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जागा शोधली. वस्तीच्या वरील डोंगरातील पावसाळी ओहळाच्या बाजूला वरतीच उपजत द्वारे असलेल्या ठिकाणी खडक फोडून खोल खड्डा करायचा व दरीच्या बाजूला भिंत उभी करून पाणी अडवायचे ठरले.

यासाठी लागणारा सर्व खर्च मातोश्री शकुंतला भास्कर खेर यांचे स्मरणार्थ खेर परिवाराने करावयाचे मान्य केले.
पावसाळा संपताच कामाला सुरुवात झाली. सुरुंग व मोठ्या पोकलेन च्या साहाय्याने खडकामध्ये 70 बाय 70 फूट वीस फूट खोल तलाव खोदून दरीच्या बाजूने बारा फूट उंच 70 फूट लांब आरसीसी भिंत बांधण्यात आली आहे.
आता मृगाच्या जलधारा बरसतील, तलाव भरेल. दिवाळीत सौरपंपाच्या सहाय्याने थेट वस्तीत पाणी येईल व दरवर्षी चार महिने पाण्यासाठी वंचित राहणारी वस्ती जल निर्भर होईल.|देवराई संस्था, मावळ.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!